1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified मंगळवार, 21 मार्च 2023 (22:10 IST)

सभागृहात येण्याची इच्छा नाही, अशी खंत व्यक्त करत भास्कर जाधव नतमस्तक

bhaskar jadhav
मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यावेळी दररोज सभागृहात उपस्थित राहणाऱ्या शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार भास्कर जाधव यांनी अधिवेनशात बोलून दिले जात नसल्याचा आरोप केला आहे.  भास्कर जाधव यांनी विधिमंडळात न जाता बाहेरूनच पायऱ्यांवर नतमस्तक होत, सभागृहात येण्याची इच्छा नाही, अशी खंत व्यक्त केली.
 
विधानसभेबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना भास्कर जाधव म्हणाले, “आज सभागृहातून बाहेर पडलो. उद्या गुढीपाडवा असल्याने घरी निघालो आहे. पुढील तीन दिवस सभागृह चालणार आहे, पण माघारी सभागृहात येणार नाही. कारण, सभागृहात येण्याची इच्छा राहिली नाही.”
 
“मनात अत्यंत वेदना होत आहेत. एकही दिवस सभागृहाचे कामकाज चुकवत नाही. मात्र, मला जाणीवपूर्वक बोल दिलं जात नाही. विषय मांडून दिलं जात नाही. सभागृहात लक्षवेधी मांडण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. माझ्या दोन लक्षवेधी लागण्यासाठी प्रयत्न केला. पण, एकही लक्षवेधी लागू शकली नाही. त्यामुळे मनात अनंत यातना आहेत,” असं भास्कर जाधव यांनी म्हटलं.
Edited by : Ratnadeep Ranshoor