गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 15 डिसेंबर 2021 (07:18 IST)

बार्टीमार्फत विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

बार्टीमार्फत बँक, रेल्वे, एल.आय.सी. इ. व तत्सम पदांसाठीच्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण तसेच पोलीस व मिलीटरी भरतीपूर्व प्रशिक्षणाकरिता काही तांत्रिक अडचणीमुळे दि. 22 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज मागविण्याकरिता मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
 
तसेच चाचणी परिक्षेचा दिनांक 26 डिसेंबर 2021 रविवार रोजी असा बदल करण्यात  आला आहे. देण्यात आलेल्या मुदतीपर्यंत विद्यार्थ्यांच्या अर्जाचा स्वीकार करण्यात यावा असे संबंधित प्रशिक्षण संस्थेस कळविण्यात आलेले असुन, जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी अर्ज करावे व या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना यासंदर्भात काही अडचणी आल्यास बार्टी, पुणे या कार्यालयाच्या 020-26343600/ 26333330 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा, असे बार्टीमार्फत प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.