रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मोबाईल गेमचा नाद खोटा, एक डोळा कायमचा गमावला

कोल्हापूरमध्ये गेम खेळत असताना अचानक मोबाईलचा स्फोट झाल्याने एका तरुणाला आपला डोळा गमावावा लागला आहे. अमोल पाटील (16) असे या जखमी मुलाचे नाव आहे. .
 
कोल्हापूरमधील कागल तालुक्यातील उंदरवाडी परिसरात अमोल पाटील राहतो. अमोलचे आई-वडिल शेतात गेल्याने तो घरी मोबाईलवर गेम खेळत होता. गेम खेळत असताना मोबाईल गरम होऊन त्याचा स्फोट झाला. या स्फोटामुळे त्याच्या हाताला जखम झाली असून, मोबाईलचा एक तुकडा अमोलच्या डोळ्यात घुसला. या प्रकरणानंतर अमोलला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आला. मात्र डॉक्टरांनी त्याचा एक डोळा निकामी झाल्याचं स्पष्ट केलं.