गुरूवार, 20 फेब्रुवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 17 फेब्रुवारी 2025 (11:33 IST)

राज्यातील एकही मराठी शाळा बंद होणार नाही, फडणवीसांनी दिले आश्वासन

devendra fadnavis
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मराठी शिक्षण जपण्यासाठी सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला असून राज्यातील एकही मराठी शाळा पटसंख्याअभावी बंद होणार नाही असे त्यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ते म्हणाले, आम्ही सातत्याने सूचना देत आहो की कोणतीही मराठी शाळा बंद करू नये. तसेच आम्ही शाळांमध्ये मराठी शिकवणे सक्तीचे केले आहे. मग ती शाळा मराठी असो किंवा हिंदी. सूचनांचे योग्य पालन होण्यासाठी आम्ही एक यंत्रणा स्थापन करत आहे. 
या पूर्वी राज्य सरकार ने लव्ह जिहाद विरोधात कायदा आणण्यासाठी 7 सदस्यांच्या समितीचे स्थापन केले आहे. या बाबत बोलताना ते म्हणाले, घटना खूप गंभीर आहे या प्रकरणांवर कारवाई केली पाहिजे. महाराष्ट्रात सातत्याने या घटनांमध्ये वाढ होत आहे. या वर आळा घालण्यासाठी कायदा आणला पाहिजे असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.