क्लॉस श्वाब यांना जागतिक आर्थिक मंचाचे संस्थापक म्हटले जाते. त्यांच्या पुढाकाराने, दरवर्षी जागतिक आर्थिक मंच शिखर परिषद आयोजित केली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी श्वाब यांची भेट घेतली. त्यांच्या बैठकीत, हरित ऊर्जा आणि इलेक्ट्रिक वाहनांसह उद्योगातील नवीन विकास आणि वाढीशी संबंधित मुद्द्यांवर तपशीलवार चर्चा करण्यात आली. यावेळी श्वाब यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी शुभेच्छा ही दिल्या.मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी आज वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक अध्यक्ष @ProfKlausSchwab यांची भेट घेतली. दावोसमध्ये महाराष्ट्र पॅव्हेलियन आता सज्ज झाले असून, पुढचे दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे असणार आहेत. महाराष्ट्रासाठी विक्रमी सामंजस्य करार यात होणार आहेत.#WEF25@wef pic.twitter.com/0rUPqnhvPX
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 20, 2025