मंगळवार, 14 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 17 ऑगस्ट 2021 (17:16 IST)

फडणवीस यांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल

महाराष्ट्रातलं ओबीसी आरक्षण या राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेलं. या राज्य सरकारला आरक्षण द्यायचं नाही आहे.ओबीसींना फसवण्याचं काम हे सरकार करतंय, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केला. केंद्र सरकारने ओबीसींची शुद्ध फसवणूक केली,अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती.यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला .
 
शरद पवार यांनी केंद्रावर खापर फोडलं नाही. त्यांना माहिती आहे देशात सगळीकडे ओबीसी आरक्षण सुरु आहे. कुठेही गेलेलं नाही फक्त महाराष्ट्रात आरक्षण गेलं आहे. या राज्य सरकारचा नाकर्तेपणा आहे आणि अजूनही त्यांचा नाकर्तेपणा सुरु आहे. या राज्य सरकारला ओबीसी आरक्षण द्यायचं नाही आहे.या राज्य सरकारला महानगरपालिका,नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत नाहीत तोपर्यंत चालढकल करायची आहे. तो पर्यंत कारणं द्यायची आहेत आणि तोच प्रकार सध्या सुरु आहे,अशी घणाघाती टीका फडणवीस यांनी केली.