रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

तर विरोधकांनी आत्महत्या थांबतील असे लिहून द्यावे

राज्य सरकारने कर्जमाफी केल्यानंतर शेतकरी आत्महत्या थांबणार असतील, तर विरोधकांनी एकत्र यावं आणि त्यांनी शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, असा लेखी प्रस्ताव द्यावा असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. ते शिर्डीत साईंच्या दर्शनाला आले असता बोलत होते.  
 
“कर्ज माफ करुन शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत असतील, तर यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र यावं, राजकीय जोडे बाहेर काढावे, आणि या राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, असा  ठोस प्रस्ताव द्यावा, मग त्यावर सरकार विचार करेल” असे त्यांनी सांगितले.