शुक्रवार, 7 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 18 मार्च 2023 (10:56 IST)

शेतकरी लॉंग मार्च : शेतकरी लॉन्ग मार्च मधील शेतकऱ्याचा मृत्यू

Death of a farmer in Farmers Long March shetkari long march  pundlik jadhav farmer death in   Farmers Long March
सध्या राज्यात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. न्याय हक्कासाठी शेतकरी लढत आहे. या साठी शेतकरी आंदोलन करत आहे. रविवार 12 मार्च पासून शेतकरी लॉन्ग मार्च मोर्चा सुरु असताना या मोर्च्यामधील शेतकऱ्याचं निधन झाले आहे. पुंडलिक अंबादास जाधव(55) असे या मयत शेतकऱ्याचं नाव आहे. जाधव हे मोहाडीच्या दिंडोरी तालुक्याचे असून मोर्च्यात वासिंद मुक्कामास होते. त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्यामुळे रुग्णालयात रुग्णवाहिकेने आणले त्यांच्यावर उपचार करून डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला.

मी माझ्या शेतकरी बांधव आणि बहिणींसह आंदोलनात जाऊ इच्छितो आहे, आता मला बरे वाटत आहे असे ते म्हणाले. ते पुन्हा आंदोलनस्थळी आले असता संध्याकाळी त्यांना उलट्या होऊन अस्वस्थता जाणवली. त्यांना पुन्हा रुग्णालयात आणले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.  पुंडलिक जाधव यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. आंदोलनासाठी लढणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

 Edited By- Priya Dixit