भरधाव डंपरची कारला धडक, एका जोडप्यासह ३ जणांचा मृत्यू
Rajasthan News: राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातील शेरगढ पोलीस स्टेशन परिसरात मंगळवारी रात्री झालेल्या रस्ते अपघातात कारमधून प्रवास करणाऱ्या एका जोडप्यासह तीन जणांचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले. तसेच, मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमसाठी पाठवण्यात आले.
पोलिसांनी सांगितले की, सभा गावाजवळ एका भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने कारला धडक दिली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले.
Edited By- Dhanashri Naik