1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Father Arrested Rape Minor Daughter in Madha Solapur

नात्याला काळिमा! नराधम बापाचे पोटच्या मुलीवर वारंवार अत्याचार; पीडिता गर्भवती

माढा तालुक्यातून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका जन्मदात्या वडिलानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करून तिला गरोदर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, माढा पोलिसांनी नराधम पित्याला अटक केली आहे.
 
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, माढा तालुक्यातील एका गावात राहणारा आरोपी वडील गेल्या काही काळापासून आपल्या मुलीचे लैंगिक शोषण करत होता. बापाच्या धाकामुळे आणि भीतीपोटी पीडित मुलगी इतके दिवस गप्प होती. मात्र, काही दिवसांपूर्वी तिची प्रकृती अचानक बिघडल्याने तिला उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
 
डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे फुटलं बंडाला वाचा
रुग्णालयात तपासणी करत असताना डॉक्टरांना मुलीच्या प्रकृतीबाबत संशय आला. त्यांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता, पीडितेने आपल्यावर ओढवलेला प्रसंग कथन केला. स्वतःच्या वडिलांनीच वारंवार अत्याचार केल्याचे समजताच रुग्णालय प्रशासनाला धक्का बसला. त्यांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
 
पोलीस कारवाई आणि गुन्हा दाखल
माढा पोलिसांनी तातडीने सोलापूरला धाव घेत पीडित मुलीचा जबाब नोंदवून घेतला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध:
बलात्कार, 
पोक्सो (POCSO) कायदा आणि 
इतर सात गंभीर कलमान्वये 
गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
पुढील लेख
नेमारचा ब्राझीलच्या फुटबॉल संघात समावेश नाही, फिफा विश्वचषकाला मुकणार का?