शुक्रवार, 5 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 11 जानेवारी 2025 (19:14 IST)

नाशिकात होणाऱ्या भावी सुनेशी वडिलांनी केले लग्न, रागात मुलगा झाला संन्यासी

Father marries future daughter-in-law in Nashik
मुलासाठी भावी पत्नी म्हणून आणलेल्या मुलीशी वडिलांनी लग्न करून तिला सावत्र आई बनवून घरी आणले या प्रकारामुळे मुलाने रागावून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. हे प्रकरण नाशिकात घडले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुलासाठी मुलगी पसंत झाली आणि दोघांनी लग्न करण्याचे ठरवले. दोन्ही घरात लग्नाची तयारी सुरु झाली. मात्र मुलगी आणि मुलाचे वडील कधी एकमेकांच्या प्रेमात पडले हे कळलेच नाही. दोघांनी लग्न केल्यावर वडिलांनी स्वतःची पत्नी आणि मुलाच्या सावत्र आईच्या रूपात मुलीला घरात आणले. या लग्नामुळे सगळ्यांना धक्काच बसला. 

हा प्रकार घडल्यावर मुलाने संसारातून विरक्ती घेत संन्यासी होण्याचा निर्णय घेतला. त्याला सगळ्यांनी समजावले मात्र त्याने कोणाचे ऐकण्यास नकार दिला. मुलासाठी वडिलांनी दुसरी मुलगी शोधण्यास सुरुवात केली असून देखील त्याने लग्न न करण्याचे स्पष्ट केले. मुलाने संन्यासी जीवन अवलंबवून घर सोडले असून तो रस्त्यावर राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. 
Edited By - Priya Dixit