1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 4 फेब्रुवारी 2023 (14:24 IST)

नाशकात तरुणींमध्ये जोरदार हाणामारी

nashik college
नाशिक शहरात भररस्त्यात दोन तरुणींमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली असून याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. महाविद्यालय परिसरात तरुणींच्या या फ्री-स्टाईल हाणामारीची घटना बघण्यासाठी चांगलीच गर्दी झाली होती.
 
नाशिक पुणे महामार्गावर असलेल्या नाशिक रोड परिसरातील एका महाविद्यालयाच्या बाहेर हा प्रकार घडला असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कॉलेजमध्ये अनेक वेळा वाद निर्माण होत असतात अनेकदा हाणामारी देखील होत असते. अशात आता कॉलेज तरुणींमध्ये देखील हाणामारी सध्या व्हायरल होत आहे.
 
या व्हायरल व्हिडिओमध्ये दोन तरुणी एकमेकांच्या झिंज्या धरुन तर लाथा बुक्क्यांनी मारहाण करत असल्याचे दिसून येत आहे. यात भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या महिलेला देखील एका तरुणीने धक्काबुक्की केल्याचं दिसून येत आहे. मात्र वाद नेमका काय ? याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.