गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 8 मार्च 2021 (07:41 IST)

मास्क न लावण्याच्या आव्हानामुळे राज ठाकरेंच्या विरोधात तक्रार दाखल

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. मात्र, राज्यात कोरोना संसर्ग वाढत आहे तो राज ठाकरे यांच्या मास्क न लावण्याच्या आव्हानामुळे, असा धक्कादायक आरोप एका व्यक्तीकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात  औरंगाबादच्या क्रांतिचौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अॅ व्होकेट रत्नाकर चौरे, असे या तक्रारदाराचे नाव असून त्यांनी राज ठाकरेंच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
 
मराठी भाषा दिनानिमित्त दादरच्या शिवाजी पार्क येथे मराठी स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील उपस्थिती लावली होती. त्यावेळी त्यांना पत्रकरांनी तुम्ही मास्क का लावत नाही?, अशी विचारणा केली त्यावर ते म्हणाले की, ‘मी मास्क लावत नाही हे तुम्हालाही सांगतो’, त्यानंतर राज ठाकरेंच मास्क प्रकरण चांगलेच चर्चेत आले.