बुधवार, 21 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 13 जून 2017 (16:54 IST)

राष्ट्रवादी आमदार दिलीप सोपल यांच्यावर गुन्हा दाखल

fir registered against-ncp-mla-dilip-sopal-in-barshi

बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीतील अपहार प्रकरणी तत्कालीन सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप सोपल यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. बार्शी बाजार समितीतील 2015 -16 च्या अपहार आणि गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन सभापती आमदार सोपल यांच्यासह 18 संचालकांवर बार्शी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा विशेष लेखा परिक्षक व्ही व्ही डोके यांनी हा गुन्हा दाखल केला. बाजार समितीमध्ये सुमारे 19 लाख रुपयांचा अपहार, तर 86 लाख रुपयांचा  गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. दुसरीकडे  सोपल समर्थक संतप्त झाले आहेत. समर्थकांनी बाजारपेठ बंद करायला लावली. मात्र शिवसेनेचे माजी आमदार राजेंद्र राऊत बाजारपेठ पूर्ववत करत आहेत. त्यामुळे बार्शीत तणावपूर्ण शांतता आहे.