गुरूवार, 27 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: दुबई , गुरूवार, 13 जुलै 2017 (09:10 IST)

सौदीच्या नाजरन शहरात ; भारतीयांसह ११ विदेशी कामगार ठार

fire in saudi
खिडकी नसलेल्या घराला लागलेल्या भीषण आगीत भारतीयांसह ११ विदेशी कामगार ठार झाले असून, अन्य सहा जण जखमी झाले आहेत. सौदी अरबमधील दक्षिणेकडील नाजरन शहरात ही शोकांतिका घडली. या घरात हे सर्व एकत्र राहायचे. हवा खेळती राहण्यासाठी या घराला खिडक्या नसल्याने धुरामुळे श्वास गुदमरून ११ जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती सौदी नागरी संरक्षण विभागाने दिली.