1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 17 एप्रिल 2023 (13:54 IST)

सराईत गुन्हेगार राकेश कोष्टीवर गोळीबार

Firing on criminal Rakesh Koshti
नाशिक शहर गुन्हेगारीचं  केंद्र बनत चाललं असून कायदा व्यवस्थेचा प्रश्न गंभीर निर्माण होत चालला आहे.  गोळीबाराच्या घटना सर्रास घडू लागल्या आहेत. रविवारी  सकाळी नवीन नाशिक परिसरातील बाजीप्रभू चौकात अज्ञात संशयितांनी सराईत गुन्हेगार राकेश कोष्टीवर गोळीबार केला. यात कोष्टी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
 
दरम्यान, गोळीबार झाल्याची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याच्या  वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलीस पथकाने घटनास्थळाची पाहणी करत तपास सुरु केला आहे. यात  काही वेळात एका संशयिताला ताब्यात देखील घेण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी दिलेल्या माहितीनुसार गोळीबार करणारा हा सराईत गुन्हेगार आहे. पूर्ववैमनस्यातून हा गोळीबार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून याप्रकरणी पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले असून जया दिवे असे नाव आहे. त्याचबरोबर मुख्य हल्लेखोरासोबत असलेल्या आणखी काही त्याच्या साथीदारांचे देखील नाव निष्पन्न झाले असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त यांनी दिली आहे. 
 
दरम्यान, गोळीबाराच्या घटनेत जखमी झालेला सराईत गुन्हेगार राकेश कोष्टी हा भाजप पदाधिकारी असून भाजप कामगार आघाडीचा शहराध्यक्ष असल्याचे समजते. 
 
Edited By -Ratnadeep Ranshoor