संबंधित माहिती
- इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या लग्नात मुख्यमंत्र्यांसह दिग्गज नेत्यांची मांदियाळी; राजकीय वर्तुळात चर्चा
- Baramati and Rahuri By-Election Result मतमोजणीला सुरुवात, महायुती की महाविकास आघाडी? संपूर्ण राज्याचे लक्ष निकालाकडे
- विदर्भात पारा ४१°C ओलांडणार, आज महाराष्ट्रात तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा
- छत्रपती संभाजीनगर येथील टेंभपुरी धरणात तीन मजुरांचा बुडून मृत्यू
- मारेकऱ्याला फाशी दिल्याशिवाय कोणत्याही राजकारणीलाआमच्या घरी प्रवेश नाही, मुलीच्या पालकांची संतप्त प्रतिक्रिया
मालवणमध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभागाकडून यशस्वी सुटका; सुरक्षितरीत्या नैसर्गिक अधिवासात सोडले
मालवण तालुक्यातील बुधवळे येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाने यशस्वीरीत्या बाहेर काढून जीवदान दिले आहे.
नेमकी घटना काय?
मालवणमधील बुधवळे-मळेशेत परिसरात शनिवारी रात्री भक्ष्याचा पाठलाग करताना एक बिबट्या अचानक विहिरीत पडला. रविवारी सकाळी स्थानिक ग्रामस्थ राजू मुणगेकर आणि संदीप बुधवळेकर यांना विहिरीतून बिबट्याचा आवाज आल्याने ही घटना उघडकीस आली. त्यांनी प्रसंगावधान राखून तातडीने वनविभागाला याची माहिती दिली.
बचाव मोहीम: माहिती मिळताच सावंतवाडी वनविभागाचे पथक आणि जलद बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी विहिरीत पिंजरा सोडण्यात आला. काही वेळाच्या अथक प्रयत्नांनंतर बिबट्याला सुखरूप जेरबंद करण्यात बचाव पथकाला यश आले.
वैद्यकीय तपासणी आणि सुटका: विहिरीबाहेर काढल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत बिबट्याची सखोल वैद्यकीय तपासणी करण्यात आली. बिबट्या पूर्णपणे सुदृढ असल्याचे आणि त्याला कोणतीही दुखापत झाली नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, त्याला मानवी वस्तीपासून दूर त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडून देण्यात आले.
वनविभागाचे आवाहन: ही मोहीम उपवनसंरक्षक मिलिश शर्मा आणि सहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुनील लाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. बिबट्या हा वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत संरक्षित प्राणी असल्याने, अशा घटना घडल्यास नागरिकांनी स्वतः काहीही न करता तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
file photo
file photo
