सोलापूर जिल्ह्यात विजयपुरा-रायचूर पॅसेंजर ट्रेनवर दगडफेकीत चार वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू, वडिलांनी टाहो फोडला
महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली. विजयपुरा-रायचूर पॅसेंजर ट्रेनवर अज्ञात व्यक्तींनी केलेल्या दगडफेकीत एका निष्पाप चार वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. मृत मुलीचे नाव शिवानी उर्फ आरोही अजित कांगरे असे आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत पण ट्रेनवर दगड कोणी फेकले हे अद्याप कळलेले नाही.
आरोही तिच्या कुटुंबासह होसनल तालुक्यात तिच्या गावावरून परत येताना विजयपूर-रायचूर पॅसेंजर ट्रेनमधून प्रवास करत होता.सोलापूरच्या होटगी गाव परिसरातून त्यांची ट्रेन जात असताना एका अज्ञात व्यक्तीने चालत्या ट्रेनवर दगडफेक केली. दुर्दैवाने तो दगड थेट खिडकीजवळ बसलेल्या लहान आरोहीच्या डोक्यावर लागला.आरोही खिडकीजवळ बसली असताना हा अपघात घडला. आरोहीच्या डोक्यातून रक्ताच्या धारा निघाल्या तिला तातडीने रुग्णालयात नेले असता तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
हे ऐकताच वडिलांनी टाहो फोडला. ते म्हणाले, माझी मुलगी अरे पप्पा, अरे पप्पा म्हणत राहिली. माझे जीव गेले असते पण ती तरी वाचली असती. असं ऐकल्यावर तिथे उपस्थित लोकांचे डोळे पाणावले.
या दुर्दैवी घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिसांनी अज्ञात हल्लेखोराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि घटनेचा सखोल तपास सुरू केला आहे.
Edited By - Priya Dixit