शनिवार, 31 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 10 डिसेंबर 2016 (10:18 IST)

बई विद्यापीठाच्या काॅलेजमध्ये मोफत जिओ वायफाय सेवा

free WiFi service in mumbai collage
रिलायन्स जिओ आता मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या 833 काॅलेजमध्ये मोफत वायफाय सेवा पुरवणार आहे. याबाबत मुंबई विद्यापीठ आणि रिलायन्स जिओमध्ये करार झाला आहे. या करारामुळे 833 काॅलेजच्या आणि काही संशोधन केंद्रातील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना 20 Mbps या स्पीडने मोफत इंटरनेट सेवेचा लाभ मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात म्हणजे 28 डिसेंबर पर्यंत 500 काॅलेजमध्ये मोफत वायफाय उपलब्ध होईल, तर उरलेल्या काॅलेजमध्ये जानेवारी अखेरपर्यंत मोफत वायफाय सेवा मिळणार आहे. यामुळे विद्यापीठाकडून  कॅशलेस व्यवहारासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.