बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

यापुढे केवळ पेपर लॉटरी सुरु राहणार, ऑनलाईन लॉटरी बंद

राज्यात ऑनलाईन लॉटरीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महसूल चोरी केला जात असल्याची तक्रार समोर येत होती. याची गंभीर दखल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी घेतला आहे. त्यानुसार यापुढे ऑनलाईन लॉटरीद्वारे होणारी महसूलचोरी लक्षात घेता. आगामी काळात राज्यात ऑनलाईन लॉटरीवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तर ऑनलाईन लॉटरी बंद करताना यापुढे केवळ पेपर लॉटरी सुरु कायम ठेवण्याबाबतही निर्णय घेण्यात आला आहे. त्याशिवाय राज्य सरकारशी संबंधीत आर्थिक व्यवहारांसाठी यापुढे पॅन क्रमांक अनिवार्य करण्याची घोषणा करण्यात आली.
 
राज्य सरकारच्या महसूल विभागाची महत्वपूर्ण बैठक मंत्रालयात पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरील निर्णय घेण्याची सूचना केली आहे. तर महसुलचोरीला आळा घालण्यासाठी इतरही अनेक उपाययोजना अजित पवार यांनी सुचविले आहेत.