गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 डिसेंबर 2023 (12:24 IST)

Ghotala Song Out गौतमी पाटीलचं नवीन गाणं धुमाकूळ घालतंय Video

Ghotala Song Out संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी गौतमी पाटील आपल्या अदा आणि नृत्याच्या तालावर सर्वांना नाचायला लावते. गौतमीच्या डांस शो ला मोठी गर्दी असते कारण तरुण तिची एक झलक पाहण्यासाठी लांबलांबून येतात. गौतमी पाटीलचे अनेक गाणी देखील युट्युबवर प्रदर्शित झाले आहे. गौतमीचे 'घोटाळा' हे गाणं नुकतचं रिलीज झालं असून ते सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
 
Being Filmy Creations या यूट्यूब चॅनेलवर हे नवं गाणं शेअर करण्यात आलं आहे. गौतमी पाटीलच्या या गाण्यातील तिचा लूक आणि अदा सर्वांना वेड लावतं आहे. तिच्या या गाण्याला चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे. 
 
या चॅनेलने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर देखील हे गाणं शेअर केले आहे. गौतमीच्या या गाण्याला युट्यूबवर हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. या गाण्यात तिने काळ्या रंगाची साडी नेसली असून त्यावर पारंपरिक गोल्डन ज्वेलरी घातली आहे.
 
गौतमी पाटीलचे घोटाळा हे गाणं वैष्णवी आदोडेनं गायले असून संकेत मेस्त्री याचे गीतकार आहे. अतुल भालचंद्र जोशी आणि सिद्धेश कुलकर्णी यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. गौतमीचे हे गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.