1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Girish Mahajans clarification on the morphed photo controversy

मंत्री गिरीश महाजन यांचा एका मुलीसोबतचा व्हायरल फोटो राजकीय गदारोळाचे कारण ठरला, प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले

महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन यांचा एका मुलीसोबतचा व्हायरल फोटो राजकीय गदारोळाचे कारण ठरला आहे. महाजन यांनी हा फोटो मॉर्फ केलेला असल्याचे म्हटले असून कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि भाजपचे प्रमुख नेते गिरीश महाजन यांचे एका तरुणीसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता मंत्री महाजन यांनी स्वतः या वादावर मौन सोडले आहे.
 
सुषमा अंधारे यांनी गिरीश महाजन यांचे फोटो शेअर केले
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या (UBT) नेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील हँडलवरून भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन एका तरुणीसोबतचे फोटो पोस्ट केले आहे. हे फोटो पोस्ट करताना अंधारे यांनी कॅप्शन दिले आहे, "अरे, हा चेहरा ओळखीचा वाटतोय...  
 
हे फोटो सोशल मीडियावर झटपट व्हायरल झाले आणि त्यामुळे वादाला तोंड फुटले. काही जण गिरीश महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे, तर काही जण त्यांना पाठिंबा देत आहे. काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी हे फोटो एआय-एडिटेड असल्याचे म्हटले आहे.
बुलढाणा येथे माध्यमांशी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी व्हायरल फोटोवर आपली पहिली प्रतिक्रिया दिली. त्यांनी आपल्या विरोधकांचे दावे स्पष्टपणे फेटाळून लावले आणि हा फोटो पूर्णपणे मॉर्फ केलेला असल्याचे सांगितले. महाजन यांनी म्हटले आहे की, त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा हा एक कट आहे. महाजन म्हणाले, "हा फोटो कोणी आणि कसा मॉर्फ केला हे मला माहीत नाही, पण तो पूर्णपणे खोटा आहे. मी मुंबई पोलीस आणि सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे."
Edited By- Dhanashri Naik
About Writer
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
पुढील लेख
LIVE: भिवंडीतील एकाच दुकानातील दूषित शोरमा खाल्ल्याने ५९ जणांना विषबाधा!