अनैतिक संबंधातून प्रेयसीची चाकूने वार करून हत्या; विवाहित प्रियकराने स्वतःवरही वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला, नागपुरातील घटना
नागपूरच्या बेल्टारोडी भागातील मनीष नगर परिसरात मंगळवारी रात्री एका हॉटेलमध्ये एक धक्कादायक घटना घडली. एका विवाहित प्रियकराने अनैतिक संबंधातून आपल्या प्रेयसीची हॉटेलच्या खोलीत हत्या केली. त्यानंतर त्याने स्वतःचा गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मृताची ओळख शिवानी राजानंद गजभिये (२८), रा. रामनगर, ८५ प्लॉट एरिया, अशी पटली आहे.
आरोपीवर वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. ते दोघे रेल्वेमध्ये एकत्र काम करत होते. दरम्यान, त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले
सोमवारी आरोपीने मनीषनगरच्या एका हॉटेलात खोली बुक केली.यासोबतच त्याने डेकोरेटरकडून खोलीत फुगेही लावून घेतले होते. मंगळवारी दुपारी २ वाजता ते दोघे हॉटेलच्या खोलीत गेले.यानंतर ते दोघे खोलीतून बाहेर आले नाहीत.
नंतर आरोपीने संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास आपल्या मित्रांना फोन करून हॉटेल मध्ये बोलावले त्याच्या बोलण्यावरून मित्रांना संशय आला. रात्री ९ वाजेच्या सुमारास मित्र हॉटेलात गेले आणि दार ठोठावले. दार आतून बंद होते. काहीही प्रतिसाद मिळाला नसल्याने हॉटेल व्यवस्थापनाला कळवले. डुप्लिकेट चावीने कुलूप उघडण्यात आले, पण ते आतून बंद होते.
अखेर दरवाजा उघडण्यात आला, आणि दोघेही रक्ताने माखलेले आढळले. शिवानीचा गळा चाकूने चिरलेला होता आणि ती मृत पडली होती.आरोपीच्या मानेवर चाकूने चिरल्याचे वार होते. हाताची नस कापलेली होती. पण तो शुद्धीवर होता. त्याला तात्काळ वैद्यकीय रुग्णालयात नेण्यात आले. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले पोलिसांना संशय आहे की, किरणने शिवानीवर वार केल्यानंतर तिच्या हातात चाकू ठेवला. या घटनेमागील खरा हेतू किरणच्या चौकशीनंतरच समोर येईल. तिच्यावर रात्री उशिरापर्यंत उपचार सुरू होते आणि त्याची प्रकृती गंभीर होती. पोलीस पुढील तपास करत आहे .
Edited By - PriyaDixit
