शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 2 नोव्हेंबर 2022 (16:36 IST)

गोंदिया : शाळेच्या शौचालयात आढळले जिवंत बाळ

baby legs
गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यात राका ग्राम येथे एका जिल्हा परिषद शाळेच्या शौचालयात जिवंत बाळ आढळल्याने खळबळ उडाली. सादर घटना मंगळवारी 1 नोव्हेंबर रोजी घडली आहे. शाळेच्या शौचालयातून बाळाच्या रडण्याचा आवाज येत असल्याने परिसरातील नागरिकांनी पाहणी केली असता त्यांना रक्ताने माखलेले जिवंत बाळ आढळले. नागरिकांनी बाळाला जिल्हा रुग्णालयात दाखल केले.आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी बाळाच्या पालकांचा शोध घेण्यास सुरु केली आहे. राका गावात आणि आजूबाजूच्या परिसरात पालकांचा शोध घेण्याचे कार्य सुरु आहे. बाळाला शौचालयात फेकून जाणारे निर्दयी पालक कोण. पोलीस शोध घेत आहे. बाळाला रुग्णालयात दाखल केले असून ते डॉक्टरांच्या देखरेख खाली आहे. 
 
Edited By - Priya Dixit