रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 5 सप्टेंबर 2020 (22:08 IST)

चला फिरायला जाऊ या, MTDC चे कोकणातील सर्व रिसॉर्ट आणि हॉटेल्स सुरू

महाराष्ट्र पर्यटन मंडळानं देखील महत्त्वाचा निर्णय घेत MTDCचे कोकणातील सर्व रिसॉर्ट आणि हॉटेल्स सुरू करण्यात येत आहेत. सध्या तरी किमान 33 टक्के बुकिंग घेतली जाणार आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं ही बुकिंग होणार असून पर्यटकांना शासनाचे सर्व नियम पाळणे बंधनकारक असणार आहे. महाराष्ट्र पर्यटन मंडळाचे कोकण विभागाचे प्रादेशिक अधिकारी दिपक माने यांनी याची माहिती दिली आहे.
 
पर्यटकांना सेल्फ डिक्लरेशनचा फॉर्म भरून देणे अनिवार्य असून कोविडबाबतची कोणतीही लक्षणे नसलेल्या व्यक्तीला याठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे. तसेच पर्यटकाचे तापमान, त्याच्या शरिरातील ऑक्सिजनची लेव्हल देखील तपासली जाणार आहे. फेसमास्क, ग्लोव्ह्ज, सॅनिटायझर देखील अनिवार्य असून गर्दी होणार नाही याची देखील काळजी घेतली जाणार आहे. दरम्यान, सध्याच्या घडीला केवळ 33 टक्के बुकिंग केली जाणार असून टप्प्याटप्प्यानं यामध्ये वाढ केली जाणार आहे. 33 टक्के ऑनलाईन बुकिंगला प्राधान्य दिलं जाणार असून त्यानंतर काऊंटर बुकिंग केली जाणार आहे,. पण, 33 टक्के ऑनलाईन बुकिंग पूर्ण झालेली असल्यास काऊंटर बुकिंग मात्र केली जाणार नाहीत. याबाबत शासनानं आदेश देखील काढले असून यामध्ये पर्यटकानं काय काळजी घ्यावी, नियम काय असणार आहेत याची संपूर्ण  माहिती दिली आहे.

महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे कोकण विभागाचे प्रादेशिक अधिकारी दिपक माने यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे आता वेळणेश्वर, गणपतीपुळे, सिंधुदुर्गमधील कुणकेश्वर येथील हॉटेल्स सुरू केली जाणार आहेत. तर, कन्टेनमेंट झोनमधील पर्यटकाला मात्र यावेळी बंदी असणार आहे.