संबंधित माहिती
- कोरोनानंतर राज्यावर गारपीटीचे संकट
- पोहण्यासाठी गेले पण अंदाज चुकला, तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू
- महाराष्ट्र विधानसभेच्या शेवटच्या दिवशी अजित पवार का म्हणाले, 'आम्ही कुत्रे, मांजर आणि कोंबडीचे प्रतिनिधित्व करत नाही'
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 31 विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह
- राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्या सर्व लोकांना सावध राहण्याचे आवाहन
राज्यपालांनी संविधानिक पदाचा मान राखावा, राजकारण करु नये : नाना पटोले
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक नियमाला धरून घेण्याचा कार्यक्रम महाविकास आघाडी सरकारचा होता. नियम बदल करणे हा विधिमंडळाचा अधिकारच आहे, त्यात घटनाबाह्य असं काहीच नाही. राज्यपालांनी संविधानिक पदाचा मान राखावा, राजकारण करु नये, असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
विधानसभा अध्यक्षपदासंदर्भात राज्यपाल यांना पत्र पाठवून संपूर्ण प्रक्रिया कळवण्यात आली होती. राज्यपालपदाचा कुठेही अपमान होणार नाही याची काळजी सरकारने घेतली होती. अध्यक्षपदाची संपूर्ण प्रक्रिया एका दिवसात पार पाडता आली असती पण शेवटच्या दिवशी सकाळी राज्यपालांनी पुन्हा पत्र पाठविलं. कायद्याचा पेच निर्माण होऊ नये म्हणून मविआ सरकारने अध्यक्षपदाची निवडणूक या अधिवेशनात घेणं टाळले. ही निवडणूक फेब्रुवारीत होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्याचा निर्णय घेतला आहे असं नाना पटोले यांनी सांगितलं.
