सोमवार, 1 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 28 डिसेंबर 2021 (15:52 IST)

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 31 विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह

31 students of government medical college corona positiveशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 31 विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह  Marathi Corona virus News Regional Marathi News In Webdunia Marathi
सध्या कोरोनाचा नवीन व्हेरियन्ट ऑमिक्रॉनची प्रकरण वाढत असता कोरोनाने देखील पाय रुतवायला सुरु केले आहे. कोरोना पुन्हा वाढत आहे. राज्यात कोरोनाची प्रकरणे वाढत असता. सांगली येथे मिरजच्या वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाचा स्फोट झाला असून या वैद्यकीय महाविद्यालयातील तब्बल 31 विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहे. या मुळे महाविद्यालयात खळबळ उडाली आहे. एवढ्या विद्यार्थिनी पॉझिटिव्ह आल्यामुळे प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. या विद्यार्थिनींमध्ये कोरोनाची लक्षणे सौम्य आहे . मिरजच्या या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सोमवारी आठ विद्यार्थिनींची चाचणी केली होती त्याची चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर विद्यार्थिनींची चाचणी केल्यावर तब्बल 31   विद्यार्थिनींना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले.