मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 28 डिसेंबर 2021 (12:05 IST)

Omicron: Covid ला लढा देण्यासाठी नवीन 'शस्त्रे', आरोग्य मंत्रालयाने या दोन कोरोना लसींना मान्यता दिली

CORBEVAX and COVOVAX tow new corona vaccine approved for emergency
कोरोनासोबतच्या युद्धादरम्यान आरोग्य मंत्रालयाने आपत्कालीन वापरासाठी आणखी दोन लसींना मंजुरी दिली आहे. आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. ही दोन लसींची नावे आहेत- CORBEVAX आणि COVOVAX. CORBEVAX आणि  COVOVAX या व्यतिरिक्त एक अँटी व्हायरल ड्रग Molnupiravir ला देखील परवानगी देण्यात आली आहे. Molnupiravir एक अँटी व्हायरल ड्रग आहे, ज्याला आता देशातील 13 कंपन्या तयार करतील. आपत्कालीन परिस्थितीत व्यस्क कोविड रूग्णांच्या उपचारात याचा वापर केला जाईल.
 
CORBEVAX लस भारतातील पहिली स्वेदशी रूपाने विकसित RBD प्रोटीन सब-यूनिट वॅक्सीन आहे जी हैदराबादस्थित फर्म बायोलॉजिकल-ईने कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी बनवले आहे. ही आता भारतात विकसित झालेली तिसरी लस आहे. तर नॅनोपार्टिकल लस COVOVAX ही सीरम इन्स्टिट्यूट, पुणे द्वारे बनवली जाईल.
 
यापूर्वी, देशाच्या केंद्रीय औषध प्राधिकरणाच्या तज्ञ समितीने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविड-19 लस 'कोव्होव्हॅक्स' ला काही अटींसह आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याची शिफारस केली होती. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) मधील सरकारी आणि नियामक प्रकरणांचे संचालक प्रकाश कुमार सिंग यांनी ऑक्टोबरमध्ये ड्रग कंट्रोलर ऑफ इंडिया (DCGI) कडे अर्ज सादर केला आणि आपत्कालीन परिस्थितीत कोवोव्हॅक्सच्या मर्यादित वापरास परवानगी देण्याची विनंती केली.
 
तज्ञ समितीने 27 नोव्हेंबर रोजी एसआयआयच्या अर्जाचे मूल्यांकन केले आणि त्यावर विचारविमर्श केला आणि फार्मास्युटिकल कंपनीला अतिरिक्त माहिती देण्यास सांगितले. आम्ही तुम्हाला सांगतो की 1 जानेवारीपासून 15 ते 18 वर्षे वयोगटातील लोक 'कोविन' पोर्टलवर लसीसाठी नोंदणी करू शकतील. त्यांच्यासाठी लसीचा पर्याय फक्त 'कोव्हॅक्सीन' असेल. 3 जानेवारीपासून बालकांचे कोविड लसीकरण सुरू करण्याची तयारी सुरू आहे.