सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 27 डिसेंबर 2021 (10:26 IST)

दिल्लीमध्ये आजपासून लागणार नाईट कर्फ्यू

दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत होत असलेल्या वाढीमुळं दिल्ली सरकारनं सोमवारपासून नाईट कर्फ्यू लावण्याची घोषणा केली आहे. दिल्लीत सध्या 1103 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.त्यानुसार दिल्लीमध्ये रात्री 11 वाजेपासून पहाटे 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू असणार आहे. दिल्लीत यलो अलर्ट लागू झाल्यानंतर ही वेळ रात्री 10 ते पहाटे 5 अशी बदलली जाईल.
दिल्लीमध्ये सध्या कोरोनाचा पॉझिटिव्हीटी दर 0.5 टक्क्याच्या पुढं गेला आहे. 10 जून नंतर प्रथमच कोरोनाची सर्वाधिक रुग्णसंख्या समोर आली आहे. 10 जून रोजी दिल्लीत कोरोनाचे 305 रुग्ण होते.
वीकेंड कर्फ्यू लावला जाणार नसून ऑड इव्हन नियमानुसार सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत दुकानं उघडी असतील. कमी गरजेच्या सेवा वस्तुंची दुकानं आणि मॉलवर बंदी लागू शकते.