बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 डिसेंबर 2021 (17:34 IST)

पोहण्यासाठी गेले पण अंदाज चुकला, तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू

नाशिक जिल्ह्यातील मखमलाबाद इथं पाटाच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. निलेश मुळे, प्रमोद जाधव, सिद्धू धोत्रे असं या मयत मुलांची नावे आहेत.
 
नेमकं काय घडलं?
गंगापूर धरणातून सध्या रब्बी हंगामासाठी आवर्तन सोडण्यात आल्याने मखमलाबाद परिसरातील पाटाला पाणी आले आहे. याच पाटाच्या पाण्यात पोहोण्यासाठी परिसरातील हे तिन्ही मित्र आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास आपल्या शाळेतील इतर 5  मित्रांसह गेले होते. या तिघांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे तिघे जण पाण्यात बुडाले. सोबतच्या मित्रांनी तिघांनाही वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु यश आले नाही. जीवरक्षक दलाच्या जवानांनीही तत्काळ धाव घेतली तरी मुलांना वाचवण्यात यश आले नाही. या तिन्ही मुलांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार या तिघांचे वय अंदाजे १४ ते १५ वर्ष आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने स्थानिकांच्या मदतीने या मुलांना कालव्याबाहेर काढले. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, तिघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. 
 
आपले मित्र पाण्यात बुडूत असल्याचे पाहून दोघांना आरडाओरडा केला. पाण्यातून बाहेर इथं आजूबाजूच्या लोकांना सांगून मदतीसाठी याचना केली. पण, परिस्थितीमुळे घाबरलेल्या या दोन मुलांना या ठिकाणाहून पळ काढला. नंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली असता तिघे जण पाण्यात बुडाल्याचे आढळले. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने स्थानिकांच्या मदतीने या मुलांना कालव्याबाहेर काढले. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, तिघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. 
 
स्थानिकांनी तातडीने याची माहिती अग्निशमन दलाला आणि पोलिसांना दिली. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अवघ्या अर्धा तासात तिघांना पाण्याबाहेर काढले आणि उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले. मात्र दुर्दैवाने या तिघाही मुलांचा उपचार सुरू होण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासना कडून देण्यात आली.
 
निलेश मुळे, प्रमोद जाधव, सिद्धू धोत्रे या तिन्ही लहान मुलांच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांनी रुग्णालयाच्या आवारात एकच आक्रोश केला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.