रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 डिसेंबर 2021 (10:51 IST)

संरक्षणमंत्री असताना महिलांनी लष्करात यावे यासाठी प्रयत्न केले- शरद पवार

"महिलांनी लष्करात यावे यासाठी संरक्षण मंत्री असताना प्रयत्न केला होता, त्यावेळी लष्करातील अधिकाऱ्यांनी महिलांना हे जमणार नाही असंही सांगितलं. मात्र तरीही मी तसा निर्णय घेतला", असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं आहे.
साताऱ्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये शरद पवार यांनी याबाबत माहिती दिली. घर पुढं नेण्यासाठी मुलींचं शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे, असंही पवार यावेळी म्हणाले. 
ग्रामीण भागातील मुलं मुंबई-पुण्यात अधिकारी पदापर्यंत पोहोचतात, याचा अभिमानही पवारांनी व्यक्त केला. शेती गरजेची आहे. पण कुटुंबातील एकानं शेती करावी आणि इतरांनी संधी मिळेल तिथं काम करत नाव कमवावं असं आवाहनही त्यांनी केलं.
"ज्ञान आणि आत्मविश्वासातून कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळवता येतं हे पाहायला मिळालं आहे. त्याला पर्याय नसल्यामुळं ज्ञान मिळवत राहायला हवं", असंही पवार म्हणाले.