शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 11 फेब्रुवारी 2021 (19:09 IST)

राजनाथ सिंहः भारताची एक इंचही जमीन देणार नाही

भारताची एक इंच जमीनही कोणत्याही देशाला मिळू देणार नाही असे विधान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत केले आहे. ते लडाख सीमेच्या स्थितीबद्दल माहिती देत होते. पँगाँग लेक भागामधून भारत आणि चीन दोन्ही देशांचे सैन्य मागे घेण्यास तयारी झाली आहे. यापूर्वी चीनने बुधवारी ही घोषणा केली होती.
 
चीनशी सुरू असलेल्या बोलण्यांमध्ये भारताने काहीही गमावले नाही असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. चीन उर्वरित मुद्द्यांबाबत गांभीर्याने विचार करेल अशी अपेक्षा असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितले.
 
राजनाथ सिंह म्हणाले, अत्यंत प्रतिकूल आणि भीषण हिमवर्षावातही शौर्य गाजवणाऱ्या आपल्या सैन्याची प्रशंसा केली पाहिजे अशी मी सभागृहाला विनंती करतो. चीन आणि भारतातील सीमाप्रश्न चर्चेद्वारे सोडवला जाऊ शकतो.

चीनबरोबर पेँगॉंगजवळील सैन्य तुकड्या दोन्ही देशांनी मागे घेण्याबाबत करार झाल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले. चीनशी अनेक पातळ्यांवर चर्चा सुरू असून आपसातील सहकार्यानुसार सर्व निर्णय घेतले जाती.

चीनशी बोलणी करताना आम्ही काही मुद्दे अग्रक्रमाने ठेवले आहेत. त्यात एलएसीचा आदर दोन्ही देशांनी करावा, जैसे थे स्थितीत एका बाजूने बदल करू नये, सर्व समझोत्यांचं चीन आणि भारत दोन्ही देशांनी पालन करावं हे तीन मुद्दे आम्ही ठळकपणे मांडल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितले.
भारताचं संरक्षण करण्यासाठी सर्व देश एकत्र आहे आहे असंही त्यांनी सांगितले.