1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 11 फेब्रुवारी 2021 (15:33 IST)

पक्षानं आदेश दिल्यास मोदींविरुद्ध निवडणूक लढवणार- नाना पटोले

Nana Patole
महाराष्ट्र कॉँग्रेसचे नवनिर्वाचीत अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिलंय. पक्षाने आदेश दिल्यास, नरेंद्र मोदींच्या विरोधात वाराणसीतून निवडणूक लढवण्यासाठी तयार आहे, असं वक्तव्य पटोले यांनी नागपुरात केलं.
 
केंद्र सरकारने लागू केलेले कृषी कायदे मागे घेतल्याशिवाय हे आंदोलन संपणार नाही असं पटोले म्हणाले. त्याचसोबत राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्यांवर कोर्टात जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
 
विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या प्रश्नी राज्यपालांवर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा दवाब आहे का हा प्रश्न असल्याचं ते म्हणाले.