मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 10 फेब्रुवारी 2021 (15:49 IST)

नाना पटोले आणि उदयनराजे भोसले यांची भेट, चर्चेला उधाण

काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष नाना पटोल आणि राज्यसभेतील भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांची सोनिया गांधी यांच्या निवासस्थाबाहेर भेट घेतली. भेटीनंतर नाना पटोले यांनी ‘जस्ट वेट अॅण्ड वॉच..’ अशी सूचक प्रतिक्रिया दिल्यानं नवी चर्चा सुरू झाली आहे.
 
महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी विधानसभा अध्यक्ष आणि पक्षातील नेते नाना पटोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीनंतर नाना पटोले काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या सदिच्छा भेटीसाठी दिल्लीला गेले होते. दिल्लीत असताना भाजपाचे राज्यसभेतील खासदार उदयनराजे यांनी पटोले यांची सोनिया गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर भेट घेतली.
 
या भेटीचा फोटोही समोर आला असून, त्यावरून राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. सोनिया गांधी यांच्या निवासस्थानासमोरून जात असताना उदयनराजेंना पटोले बाहेर दिसले. त्यामुळे त्यांनी गाडी थांबवून त्यांची भेट घेतली व प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केलं, असं उदयनराजे यांनी  म्हटलं आहे.