मंगळवार, 11 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 डिसेंबर 2021 (10:25 IST)

महिला सरपंचाची निघृण हत्या; मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळला

Brutal murder of a woman sarpanch; The body was found nakedमहिला सरपंचाची निघृण हत्या; मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळला  Marathi Regional News  In Webdunia Marathi
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात आदिस्ते गावातील महिला सरपंचाची अज्ञाताने डोक्यात वार करून निर्घृण हत्या केली आहे. महिलेचा मृतदेह तुडील भेलोशी मार्गाजवळ आदिस्ते गावाच्या उबटआळी च्या जवळच्या जंगलात विवस्त्र अवस्थेत  आढळला. मृतदेहा ची अवस्था बघून महिलेवर बलात्कार करून हत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मृतक महिलेची ओळख महिला सरपंच मीनाक्षी मनोहर खिडबिडे (48) अशी पटली आहे. 
सदर महिला दुपारी जंगलात लाकडं आणण्यासाठी गेली असताना ही घटना घडलेली आहे. गावातील काही तरुणांनी रस्त्यावर लाकडे बांधलेली बघितली. जवळ शोध घेत असताना जंगलात त्यांना महिलेचे मृतदेह आढळले. महिलेच्या डोक्यात  फाटा मारून तिचा खून केला असून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे संशय व्यक्त केले जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनास पाठविले असून प्रकरणाचा तपास करत आहे.