रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 डिसेंबर 2021 (08:39 IST)

आनंदराज आंबेडकर यांची रामदास आठवलेंवर टीका

केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी थेट टीका केली आहे. "आठवले म्हणजे आंबेडकरी चळवळीला लागलेला कलंक असल्याचं" आनंदराज आंबेडकर म्हणाले.
कोरेगाव भीमा येथील कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यासाठी आनंदराज आंबेडकर याठिकाणी आले होते. त्यावेळी विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर त्यांनी आठवलेंवर टीका केली.
ओमिक्रॉन गंभीर विषाणू नाही, त्याचा धोका जास्त नाही त्यामुळं यावर्षी शौर्यदिन लाखोंच्या जनसमुदायाच्या उपस्थितीत संपन्न होईल असंही ते यावेळी म्हणाले.
वंचित आघाडीवर मात्र त्यांनी टीका केली नाही. वंचितला भाजपची बी टीम म्हटलं जातं, पण कुणीही वेगळा पर्याय देऊन उभं राहिलं तर हा आरोप होतच असतो असं ते म्हणाले.