रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 डिसेंबर 2021 (08:08 IST)

तेरावा सदस्य निलंबित करण्याचा मविआचा डाव’ – देवेंद्र फडणवीस

विधानसभेच्या पायऱ्यांवरून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे येताच भाजप आमदार नितेश राणे यांनी म्याऊ-म्याऊ करत डिवचलं होतं. नितेश राणे यांच्य वक्तव्यावर शिवसेना आमदार आक्रमक झाले आहेत. याप्रकरणी नितेश राणे यांना कायमस्वरुपी निलंबित करण्याची मागणी शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी आक्रमक मागणी केली आहे. तर भास्कर जाधव यांनी केलेल्या मागणीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सवाल उपस्थित केला आहे.
भाजप पक्षाचे १२ आमदार निलंबित करण्यात आले आहेत. त्यामुळे आता तेरावा सदस्य निलंबित करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा डाव असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षांनी विरोधकांकडे पाहायचे नाही, असे ठरवलं आहे का? असा सवालही फडणवीसांनी उपस्थित केला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमचे १२ आमदार निलंबित करण्यात आले आहेत. त्यामुळे आता आणखी एका आमदाराला निलंबित करण्याचा डाव महाविकास आघाडी सरकारचा आहे. भाजप आमदार आमचा सदस्य असूनही त्याला आम्ही जाब विचारू, मात्र त्यांना निलंबित करणे म्हणजे लोकशाहीची हत्या होईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.