सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 27 डिसेंबर 2021 (22:47 IST)

छत्रपती शिवरायांच्या त्र्यंबकेश्वर भेटीला 358 वर्षे पूर्ण होत आहे

31 डिसेंबरला राजे छत्रपती शिवरायांच्या त्र्यंबकेश्वर भेटीला 358 वर्षे पूर्ण होत आहे. 31 डिसेंबर 1663 ला छत्रपती शिवाजी महाराज प्रथमच त्रंबकेश्वर ला आले होते. राजे छत्रपती शिवराय यांनी  त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेतलें.
 
सुरतेवर स्वारी करण्यासाठी जव्हार मार्गे त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन ते रवाना झाले. वेदमूर्ती आप्पा देव भट ढरगे त्यांचे क्षेत्र उपाध्याय होते. इसवी सन 1670 मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी त्र्यंबक गड , ब्रह्मगिरी उर्फ त्र्यंबक गड व त्रंबक गाव जिंकून घेतले, 351 वर्ष या माहिती झाले आहे.वरील माहिती त्रंबकेश्वर मधील एका जुन्या फलकानुसार असून फलक वर माहिती शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे कृत शिवस्पर्श मधील आहे. दरम्यान आता पूर्वीचे ताम्रपत्र इतिहास संशोधक पुण्याच्या म्युझियममध्ये आहे . चेतन ढरगे ,सुरेश ढरगे यांचे कडून झेरॉक्स फोटो संग्रहित .
 
त्र्यंबकेश्वरला छत्रपती भोसले घराण्याचे तिर्थोपाध्याय ढेरगे गुरूजी यांच्या संग्रही तत्कालीन कौलनामे, पत्र यांच्या फोटो कॉपी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी भगवान त्र्यंबकराजास पूजा अभिषेक केला तेव्हा त्यांचे पौरोहित्य ढरेगे यांचे पूर्वज आपदेवभट ढेरगे यांनी केले होते. त्र्यंबकेश्वरला पारंपरिक तिर्थोपाध्यायांची घरे आहेत. त्यांच्याकडे नामावळी म्हणजेच वंशावळीदेखील आहेत. शेकडो वर्षांपूर्वी येथे आलेले भाविक या नामावळीत आपला आपले नाव लिहून स्वाक्षरी करीत, तसेच अभिप्राय लिहीत असत. या वंशावळीची गरज भासल्यास राजदरबारात, न्यायालयात पुरावे म्हणून देखील सादर केल्याचे सांगितले जाते. अशाच नामावळीत शिवाजीराजे यांची स्वाक्षरी आहे. महाराज ३१ डिसेंबर १६६३ रोजी त्र्यंबकेश्वर येथे आले आणि १ जानेवारी १६६४ रोजी ते सुरतकडे निघाले व जव्हारजवळ पोहचले, असा उल्लेख शिवचरीत्रात आढळतो. त्यावेळी त्यांच्यासोबत निवडक चार हजार घोडेस्वार होते.