मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 27 डिसेंबर 2021 (22:35 IST)

एसटीचे संपावरील आणखी १७४ कर्मचारी बडतर्फ

Another 174 ST workers on strike
गेले दीड महिन्यापेक्षा अधिक काळ गाजलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट हाती येते आहे. आज एकूण १७४ एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. तर शुक्रवारी १८२ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं होतं. दरम्यान, आतापर्यंत एकूण ४१५ संपकरी कर्मचारी बडतर्फ झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
 
दरम्यान, संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवरील कारवाईला आता अधिक वेग आला आहे. शुक्रवारपर्यंत एकूण २४१ एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं होतं. त्यानंतर आलेल्या सलगच्या सुट्ट्यांमुळे ही कारवाई थंड झाली होती. आता पुन्हा या कारवाईला वेग आला असून आज पुन्हा १७४ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
 
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यावर करण्यात येत असलेल्या कारवाई कोणत्याही परिस्थिती मागे घेतली जाणार नसल्याचं वक्तव्य परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं आहे. त्यामुळे बडतर्फ कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची आता कोणतीही शक्यता नसल्याचं बोललं जातंय. सुरुवातील निलंबन झालेल्यांना कामावर रुजू होण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. मात्र सरकारच्या आवाहनला संपकरी कर्मचाऱ्यांनी केराची टोपली दाखवली. या काळात जे कर्मचारी कामावर रुजू झाले होते, त्यांच्यावरील कारवाई मागे घेतली गेली आहे. मात्र तरिही अनेकजण संपावर ठाम आहेत. अशांवर निलंबनाची कारवाई केली जाते आहे, अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यावर होत असलेली कारवाई मागे घेतली जाणार नाही, असंही त्यांनी म्हटलंय.