मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 27 डिसेंबर 2021 (15:22 IST)

महाविद्यालय तरुणीवर विवाहित पुरूषाकडून अत्याचार

अहमदनगर जिल्ह्यात युवतीवर विवाहित पुरूषाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. नगर तालुक्यातील एका गावात राहणार्‍या पिडीत युवतीने फिर्याद दिली आहे. ही युवती 22 वर्षीय असून महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.
23 डिसेंबर 2021 च्या रात्री नऊ ते 24 डिसेंबर 2021 च्या सकाळी सात वाजेच्या दरम्यान देवगाव (ता. नगर) येथील रिसॉल्टवर ही घटना घडली.बापु मुठे हा फिर्यादी युवतीला म्हणाला, माझे तुझ्यावर प्रेम आहे, तु जर मला नकार दिला तर मी
औषध घेवुन आत्महत्या करील, अशी धमकी दिल्याने फिर्यादी युवती बापु सोबत गेली. 23 डिसेंबर 2021 च्या रात्री देवगाव येथील रिसॉल्टवर बापुने फिर्यादी युवतीवर अत्याचार केले.
त्यानंतर फिर्यादी युवतीने तु माझ्यासोबत असे का केले, अशी विचारणा बापुकडे केली असता तो तिला म्हणाला, मी माझी पहिली पत्नी हिला फारकत देणार आहे व तुझ्यासोबत लग्न करणार आहे. घटना घडल्यानंतर पीडित युवतीने
एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून बापु मुठे विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मुठे विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक पाठक करीत आहे.