सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 27 डिसेंबर 2021 (10:28 IST)

महाराष्ट्रात मंगळवारपासून पावसाची शक्यता

महाराष्ट्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असल्यामुळं मंगळवारपासून अनेक जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.
प्रामुख्यानं मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी गारपीट आणि वीजांच्या कडकडाटासह पावसाची तर उत्तर महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे. कोकणात मात्र हवामान कोरडं राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
उत्तर भारतात सध्या वाऱ्यांची चक्रीय स्थिती आहे. त्यामुळं या भागात कमी दाबाचा पट्टा तयार होईल. तसंच दक्षिण-पश्चिम राजस्थानापासून विदर्भापर्यंतही कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे.
याचा परिणाम म्हणजे राज्यात काही भागांत पाऊस होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणा, चंदिगड, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल या राज्यांतही पावसाची शक्यता आहे.