बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 27 डिसेंबर 2021 (08:34 IST)

सेफ्टी टँकमध्ये तिघे पडले; दोघांचा मृत्यू

अहमदनगर जिल्ह्यात सेफ्टी टँकमध्ये पडून दोघांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. जिल्ह्यातील निंबळक (ता. नगर) येथे ही घटना घडली.
साहेबराव भागाजी खेसे (वय 50 रा. निंबळक) व कामगार अरूण श्रीधर देठे (वय 38 रा. नागापुर) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. अजून एक कामगार जखमी झाला असून त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
सेफ्टी टँकमधील मैला काढण्यासाठी साहेबराव खेसे यांनी दोन कामगार बोलवले होते. मैला काढताना एक कामगार टॅंकमध्ये पडला. त्याला बाहेर काढण्यासाठी मालक खेसे व दुसरा कामगार प्रयत्न करत असताना ते देखील त्यामध्ये पडले. यामध्ये खेसे व एक कामगाराचा मृत्यू झाला आहे. दुसरा कामगार जखमी झाला आहे.