शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 27 डिसेंबर 2021 (10:22 IST)

तिसरी लाट आली तर ती ती ओमिक्रॉनचीच असेल - राजेश टोपे

महाराष्ट्रात सध्या ओमिक्रॉनच्या रुग्णांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं हा धोका गंभीर असून तिसरी लाट आलीच तर ती ओमिक्रॉनचीच असेल, अशा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.
राज्यातील कोरानाची सद्यस्थिती आणि नव्या निर्बंधांबाबत राजेश टोपे यांनी सविस्तर माहिती दिली, त्यावेळी त्यांनी ओमिक्रॉनच्या धोक्यापासून सावध राहण्याचा सल्ला दिला. त्यासाठी निर्बंधांसह कोरोनाच्या नियमाचं पालन करण्याचा सल्लाही दिला.
राज्यातील निर्बंधांचा चुकीचा अर्थ काढू नये, असं आवाहन टोपे यांनी केलं. राज्यात सध्या लग्नसराई सुरू आहे. तसंच नाताळ नवर्षामुळं हे निर्बंध गरजेचे असल्याचं त्यांनी सांगितलं.
 
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत जाऊन ज्या दिवशी राज्याला 800 मॅट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता लागेल, त्यादिवशी राज्यात लॉकडाऊनबाबत निर्णय घ्यावा लागेल, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.