गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 27 डिसेंबर 2021 (10:39 IST)

कोंबड्याला मांजर बनवून कोकणचे प्रश्न सुटणार का? - अजित पवार

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे विधानसभेत प्रवेश करताना नितेश राणे यांनी काढलेल्या आवाजानंतर नवाब मलिक आणि नितेश राणे यांच्यात प्राण्यांची चित्र पोस्ट करत ट्विटरवर युद्ध रंगलं.
या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राणेंना फटकारलं आहे. "कोंबड्यांना मांजर केलं जात असल्याचं मी टीव्हीवर पाहत आहे, पण अशाने कोकणाचे प्रश्न सुटणार आहेत का? कोकणाचा विकास होईल का?" असं अजित पवार म्हणाले.
यावेळी त्यांनी नारायण राणेंवरही हल्लाबोल केला. "संस्था उभ्या करायला अक्कल लागते, मात्र, संस्था अडचणीत आणायला अक्कल लागत नाही," असं अजित पवार रत्नागिरीमध्ये म्हणाले.
तर कणकवलीतील मारहाण प्रकरणी पोलिस अधिकाराचा गैरवापर करत नितेश राणे आणि संदेश सावंत यांच्या अटकेसाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला आहे.
यावेळी नारायण राणेंनी पवारांनाही प्रत्युत्तर दिलं. "पवार अक्कल लागते असं त्यांच्या कार्यकर्त्यांनाच म्हणाले. पण सत्तेमध्ये असलेल्यांनी अकलेचे काय तारे तोडले, हे सर्वांना कळालं आहे" अशी टीका त्यांनी केली.