शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 डिसेंबर 2021 (11:39 IST)

'शाळा-कॉलेज सुरू ठेवायचे की बंद, परिस्थिती पाहून लवकरच निर्णय घेतला जाईल'

आदित्य ठाकरे म्हणाले की, 'सध्या ख्रिसमसमुळे शाळा-महाविद्यालयांना सुटी सुरू आहे. पण सुट्टीनंतर शाळा-कॉलेज सुरू ठेवायचे की नाही? परिस्थिती पाहून लवकरच निर्णय घेतला जाईल.
 
महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाने कहर केला आहे. यासह  देशातील एकूण प्रकरणांपैकी 25 टक्के ओमिक्रॉनची प्रकरणे महाराष्ट्रातही नोंदवली गेली आहेत. अशा स्थितीत शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय सरकार घेणार आहे का, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहे. या प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी दिली.
 
आदित्य ठाकरे निःसंदिग्ध आणि स्पष्ट शब्दात म्हणाले की, 'ओमिक्रॉनचा धोका आणि पुन्हा एकदा कोरोना संसर्ग झपाट्याने वाढल्याने एक नवीन आव्हान समोर आले आहे. अशा स्थितीत परिस्थितीवर नजर ठेवली जात आहे. परिस्थिती पाहून लवकरच निर्णय घेतला जाईल. येथे पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी हे वक्तव्य केले.
 
'सुटीनंतर शाळा-कॉलेज सुरू करण्याचा निर्णय, सध्या आढावा घेत आहोत' 
पुढे आदित्य ठाकरे म्हणाले, 'सध्या परिस्थिती गंभीर नसून संसर्गाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत आपण सर्वांनी आपली जबाबदारी समजून घेतली पाहिजे. प्रत्येकाने गर्दी टाळणे आणि मास्क लावणे आवश्यक आहे. सध्या नाताळनिमित्त शाळा-महाविद्यालयांना सुट्ट्या सुरू आहेत. पण सुट्टीनंतर शाळा-कॉलेज सुरू ठेवायचे की नाही? परिस्थिती पाहून लवकरच निर्णय घेतला जाईल.
 
'शाळा-महाविद्यालये बंद होणे दु:खद आहे, पण सर्वात आधी आरोग्य आहे'
 आदित्य ठाकरे म्हणाले की, 'अनेक मुलांनी दोन वर्षांपासून शाळाही पाहिलेली नाही. ही खुपच खेदाची बाब आहे. पण आपली पहिली आणि प्रमुख गरज सर्वांचे आरोग्य आहे. अशा परिस्थितीत परिस्थिती पाहता काही कठीण निर्णय घ्यावे लागतील. या आठवड्यानंतर परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर शाळा-महाविद्यालये सुरू ठेवायची की नाही, याबाबत निर्णय घेतला जाईल.