रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 3 नोव्हेंबर 2021 (14:55 IST)

परमबीर सिंगांचा पत्ता आदित्य ठाकरेंना विचारावा- नितेश राणेंची टीका

परमबीर सिंग सध्या बेल्जियममध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना देशातून पळून जायला मदत केली म्हणणाऱ्यांनी आधी ते महाराष्ट्र सोडून कसे गेले? याचे उत्तर द्यावे असं राणे म्हणाले.
 
सुशांतसिंग मृत्यू, दिशा सालियन, टीआरपी घोटाळा या प्रकरणात परमबीर सिंग तुमच्यासाठीच काम करत होते ना? मग ते आता तुम्हाला नकोसे का झालेत? असा प्रश्न राणेंनी उपस्थित केला.
 
परमबीर सिंग आयुक्त असताना आदित्य ठाकरे नियमितपणे त्यांच्या संपर्कात होते. त्यावेळच्या सीसीटीव्ही फुटेज आणि सीडीआरवरून ते स्पष्ट होईल. मग त्यांचा पत्ता आदित्य ठाकरेंना विचारा असं म्हणायचं का? असंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे.