मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 3 नोव्हेंबर 2021 (12:56 IST)

ती 13 वर्षीय मुलगी पेन आणण्यासाठी गेली होती, दुकानदाराने चाकूचा धाक दाखवून बलात्कार केला

बीडच्या वडवणी तालुक्यात 13 वर्षीय मुलीवर 20 वर्षीय नराधमाने बलात्कार केला आहे. वडवणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
 
वडवणी तालुक्यातील १३ वर्षीय पीडित मुलीचे पालक ऊस तोडण्यासाठी कारखान्यात गेले होते. पीडित तरुणी गावात नातेवाईकांकडे राहत होती. 30 ऑक्टोबर रोजी पीडित मुलगी गावातील किराणा दुकानात पेन आणण्यासाठी गेली होती. यादरम्यान दुकानावर असलेल्या 20 वर्षीय नराधमाने, पीडितेचे आई-वडील कारखान्याला गेल्याची व पीडिता एकटी असल्याची संधी साधून, दुकानाच्या मागच्या बाजूला, चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बळजबरी अत्याचार केला आहे.
 
दरम्यान, ती घरी आल्यानंतर तिने चुलत बहिणीला घटनेची माहिती दिली. हा सर्व प्रकार तिने पीडितेच्या पालकांना सांगितल्यानंतर तिचे आई-वडीलही गावात आले.
 
१३ वर्षीय पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर गावातील २० वर्षीय नराधम किराणा दुकानदार गणेश संदिपान गोंडे याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि अत्याचार कायद्याच्या कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.