मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 3 नोव्हेंबर 2021 (09:49 IST)

फुग्याशी खेळणे चिमुकल्याच्या जीवावर बेतले; घशात तुकडा अडकल्याने 6 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

नागपूर येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे ज्यात एका 6 वर्षाच्या मुलाचा फुगा गळ्यात अडल्यामुळे मृत्यू झाला आहे. नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी साडेचार वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
 
दुर्दैवी मृत्यू झालेल्या मुलाचं  नाव विजय पटेल असं आहे. विजयच्या मृत्यूमुळे परिसरात एकचं खळबळ माजली आहे. विजयच्या निधनामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळलं आहे. 
 
नेमकं काय घडलं?
विजय फुगा फुगवत होता. फुगा फुगवत असताना फुगा अचानक घशात अडकला. फुगा गळ्यात अडकल्याने विजयला श्वास घ्यायला त्रास होवू लागला. तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण रुग्णालयात दाखल करताचं  विजयला मृत घोषित करण्यात आलं. घडल्या प्रकरणाची नंदनवन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा कुटुंबीयांना मानसिक धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.