'अजित पवारांशी संबंधित मालमत्तेवर प्राप्तीकर विभागाची टाच नाही'
प्राप्तीकर विभागाने टाच आणलेल्या संपत्तीमध्ये उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याशी संबंधित कोणत्याही संपत्तीचा समावेश नसल्याचं त्यांच्या वकिलांनी स्पष्ट केलं आहे.
मंगळवारी (2 नोव्हेंबर) प्राप्तीकर विभागानं कारवाई करत अजित पवारांशी संबंधित मालमत्तांवर टाच आणल्याचं म्हटलं जात होतं. राज्यातील महाविकास आघाडी सरकारसाठी हा मोठा धक्का समजला जात होता.
मात्र, प्रत्यक्षात तसं काहीही झालं नसून माध्यमांमधून समोर येणाऱ्या बातम्या निराधार आणि खोडसाळपणातून दिल्या जात असल्याचा दावा अजित पवारांचे वकील अॅड. प्रशांत पाटील यांनी केला.
अजित पवार यांच्याशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच आलेली नाही. केवळ काही मुद्द्यांबाबत विचारणा करण्यात आली आहे. त्याला योग्य ते उत्तर देणार असल्याचं पाटील म्हणाले.