बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 6 जानेवारी 2025 (18:34 IST)

संतोष देशमुख खून प्रकरणासंदर्भात धनंजय मुंडे यांना राज्यपाल मंत्रिपदावरून हटवणार!

dhananjay munde
बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच देशमुख यांचे 9 डिसेंबर रोजी काही लोकांनी पाणचक्की कंपनीकडून खंडणी घेण्याच्या प्रयत्नाला विरोध केल्याच्या आरोपावरून अपहरण करण्यात आले आणि नंतर त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणात आता पर्यंत सात जणांना अटक केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री यांचे सहकारी वाल्मिक कराड यांना खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. 

या प्रकरणी विरोधकांसोबतच सत्ताधारी पक्षातील अनेक नेते मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. ही मागणी घेऊन काही नेते महाराष्ट्राच्या राज्यपालांपर्यंत पोहोचले आहे. 
आज सोमवारी नेत्यांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट घेतली.

या वेळी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निष्पक्ष तपास व्हावा आणि मंत्री धंनजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. तसेच नेत्यांनी राजभवनात राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना निवेदन देत म्हटले आहे की, कायद्याचे राज्य आणि न्याय व्यवस्थेवर जनतेचा विश्वास कायम ठेवण्यासाठी राज्यपालांनी निर्णायक कारवाई करण्याचे निवेदन दिले आहे. 

नेत्यांच्या शिष्टमंडळाने मंत्री मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, कराड यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा, निष्काळजी पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी आणि बीडमधील खंडणी व गुंडगिरीला आळा घालावा अशी मागणी केली.

राज्यपालांना दिलेल्या निवेदनावर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) बीडचे खासदार बजरंग सोनवणे, काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार, आमदार जितेंद्र आव्हाड, अंबादास दानवे आदींनी  स्वाक्षरी केल्या आहेत.
 
Edited By - Priya Dixit